सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा थरार सुरु आहे. अशातच होबार्ट हरिकेन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होबार्ट हरिकेन्सचा कर्णधार मॅथ्यू वेडला बिग बॅश लीगमधील एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याला दोन वर्षांत दुसऱ्यांदा आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे माजी कसोटी कर्णधार टीम पेन बिग बॅश लीगमध्ये परतला आहे. पेन तब्बल ५ वर्षांनंतर बिग बॅश लीगमध्ये पुनरागमन करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या निलंबनामुळे मॅथ्यू वेड ख्रिसमसच्या संध्याकाळी, २४ डिसेंबर रोजी मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी टीम पेन संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी एक निवेदन जारी केले की, गेल्या १८ महिन्यांत आचारसंहितेचे तीन स्तर १ उल्लंघन केल्यामुळे वेडला एक निलंबन पॉइंट देण्यात आला आहे.

३४ वर्षीय तस्मानियन व्यक्तीवर “श्रवणीय अश्लीलतेच्या दोन घटना” तसेच “क्रिकेट उपकरणाचा गैरवापर केल्याचा एक प्रसंग” असा आरोप ठेवण्यात आला होता.

पर्थ स्कॉचर्सचा स्टार फाफ डू प्लेसिसने शॉट खेळण्यापूर्वी वेड “बोल्ड” ओरडल्यामुळे त्याची विकेट गमावली होती. त्यानंतर वेड आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी धावला, त्यावेळी प्लेसिस संतापलेला दिसत होता.

हेही वाचा – IPL Auction 2023: बसचालकाचा मुलगा बनला लखपती; संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणार

पेनने आपला शेवटचा सामना हरिकेन्सच्या प्रसिद्ध जांभळ्या शर्टमध्ये ४ फेब्रुवारी २०१८ रोजी खेळला होता. पेनने हरिकेन्ससाठी ४३ सामन्यात १११९ धावा केल्या आहेत. आज तो ४४वा सामना हरिकेन्सकडून खेळताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bbl matthew wade banned for one match tim paine returns to the team vbm