ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज शेन वॉटसन हा आपल्या मैदानावरील फटकेबाजसाठी कायम चर्चेत असतो. सलामीवीर म्हणून मैदानात येऊन गोलंदाजांचा समाचार घेणारा म्हणून त्याची आजही ख्याती आहे. सध्या तो बिग बॅश लीग या स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत वॉटसन सिडनी थंडर्स या संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत तो त्याच्या खेळासाठी चर्चेत आहेच. पण सध्या तो अजून एका गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. ती गोष्ट म्हणजे त्याचा मुलगा विल्यम.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी संघाचा अडलेड संघाविरुद्ध सामना सुरु होता. सामन्यात वॉटसन क्षेत्ररक्षण करत असताना एक चिमुरडा मैदानात आला. हा चिमुरडा म्हणजेच वॉटसनचा मुलगा विल्यम. विल्यम मैदानात आला आणि त्याने थेट आपला बाबा शेन वॉटसन याच्याकडे धाव घेतली. त्याला पाहून वॉटसनदेखील खुश झाला. वॉटसनने त्याला थांबवले. तो स्वतः गुडघ्यावर बसला आणि त्याने विल्यमच्या हातातील टोपीवर आणि टी शर्टवर स्वाक्षरी दिली. तसेच त्यानंतर आपल्या चिमुरड्याला मिठी मारली आणि गोड पापाही दिला.

बिग बॅश लीग च्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान, या सामन्यात वॉटसनने ४० चेंडूत ६८ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.