भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दोन संघांमध्ये एक रंजक सामना खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या अनुक्रमे बीसीसीआय अध्यक्ष इलेव्हन आणि बीसीसीआय सचिव इलेव्हन असे दोन संघ आमनेसामने आले. यात जय शाह यांच्या संघाने गांगुलीच्या संघाचा एका धावेने पराभव केला.
प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात उतरलेल्या गांगुलीने दमदार फलंदाजी करताना ३५ धावांची शानदार खेळी केली. मात्र, या रोमांचक सामन्यात जय शहाच्या संघाला एका धावेने विजय मिळवण्यात यश आले. प्रथम फलंदाजी करताना जय शहा यांच्या संघाने ३ गडी गमावून १२८ धावा केल्या. संघासाठी जयदेव शाह यांनी ४० धावा केल्या. तर अरुण धुमाळ यांनी ३६ धावांची खेळी केली. त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव १० धावांवर नाबाद राहिले. सौरव गांगुलीने १९ धावांत एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात गांगुलीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी १२९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गांगुलीने जोरदार फलंदाजी केली. यादरम्यान त्याच्या ऑफ साइडमध्ये अनेक ट्रेड मार्क स्ट्रोक दिसले. या सामन्यात गांगुलीने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. नियमानुसार त्याला निवृत्ती घ्यावी लागली. गांगुलीशिवाय अभिषेक दालमियाने १३ आणि मोहम्मद अझरुद्दीनने २ धावा केल्या.
अशाप्रकारे, गांगुलीच्या संघाला निर्धारित १५ षटकात केवळ १२७ धावा करता आल्या आणि संघाचा सामना एका धावेने गमवावा लागला. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी शानदार गोलंदाजी करताना ५८ धावांत तीन बळी घेतले.