BCCI Announce Team India New Coach: टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक स्तरावर चर्चा सुरु आहे. अखेरीस आता बीसीसीआयने याबाबत निर्णय घेत राहुल द्रविडच्याच स्वीय सहकाऱ्याची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. याबाबत बीसीसीआयने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड केल्याचे समजत आहे. यासह रमेश पोवार हे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारतील असेही सांगण्यात आले आहे.

टीम इंडियाच्या सिनियर महिला संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षक पदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड झाली आहे. येत्या ९ डिसेंबर पासून टीम इंडियाचा महिला संघ हा ऑस्ट्रेलियासह टी २० मालिका खेळणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेची पूर्वतयारी करताना बीसीसीआयने ऋषिकेश कानिटकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महिला संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारताना कानिटकर यांनी हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हंटले आहे. भारताच्या महिला संघात अनेक गुणी व अष्टपैलू खेळाडू आहेत ही जबाबदारी निभावताना आपल्यालाही बरंच शिकायला मिळणार आहे असेही कानिटकर म्हणाले आहेत.

टीम इंडियाला मिळाला नवीन प्रशिक्षक

दरम्यान, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी रमेश पोवार यांची नेमणूक करण्यात आल्याची सुद्धा आज बीसीसीआयने घोषणा केली. यापूर्वी व्ही व्ही एस लक्ष्मण या पदी कार्यरत होते. लक्ष्मणने यंदा राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात प्रशिक्षक पद भूषवले होते.

हे ही वाचा<< FIFA फुटबॉल विश्वचषक संपताच ‘974 स्टेडियम’ होणार पूर्णपणे गायब; ‘या’ जादूमागचं खास गुपित, जाणून घ्या

दुसरीकडे टीम इंडिया पुरुष संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मधील पहिल्या ओडीआयमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला होता यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर सुद्धा टीका होत आहे. भारतीय संघातील काही खेळाडूंना येत्या काळात डच्चू दिला जाऊ शकतो अशाही चर्चा आहेत तर राहुल द्रविडची सुद्धा प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.