ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या दौऱ्यासाठी रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन आश्विनला निवड समितीने पुन्हा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

जाडेजा आणि आश्विनसोबत लोकेश राहुल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या खेळाडूंचीही निवड झालेली नाहीये. तर यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला संघात अनपेक्षितपणे जागा मिळाली आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेलाही संघात जागा मिळाली आहे. टी-२० संघातून वगळलं गेल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी निवड समितीच्या निर्णयावर टीका केली होती.

असा असेल न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.

अवश्य वाचा – गावसकर, शास्त्रींमुळेच आम्ही चॅम्पियन्स करंडक जिंकलो, पाक संघ व्यवस्थापकाची खोचक टीका

Story img Loader