बीसीसीआयने जानेवारी महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध वन-डे मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. १७ सदस्यीय संघांमध्ये महेंद्रसिंह धोनीने पुनरागमन केलेलं असून बीसीसीआयने यंदा संघात नवीन प्रयोग करणं टाळलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ३ तर न्यूझीलंडविरुद्ध ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद

Story img Loader