Indian Test Team Announce: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा खेळली जात आहे. या कसोटी मालिकेतील आतापर्यंत दोन सामने पार पडले आहेत. दोन्ही सामन्यांत भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. तसेच उर्वरित दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने रविवारी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रणजी क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या सरफराज खानकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. बीसीसीआयने शेवटच्या दोन कसोटींसाठीही तोच संघ निवडला आहे, जो पहिल्या दोन कसोटीत टीम इंडियाचा भाग होता. याशिवाय राखीव यष्टिरक्षक इशान किशन हा देखील संघाचा एक भाग आहे.

टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सलग दुसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. यासह, बीजीटीवरील भारताचा कब्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.या मालिकेत अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत. त्यामुळे ते दोन्ही जिंकून ऑस्ट्रेलिया २-२ अशी बरोबरी करू शकतो.

शेवटच्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

हेही वाचा –IND vs AUS 2nd Test: ‘या’ खेळाडूंना विजयाचे श्रेय देताना रोहित शर्माने सांगितले दिल्लीच्या खेळपट्टीबाबत काय होती योजना?

याशिवाय बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही टीम इंडियाची घोषणा केली आहे. रवींद्र जडेजाने दीर्घ कालावधीनंतर एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन केले आहे. त्याचवेळी जयदेव उनाडकटचेही १० वर्षांनंतर संघात पुनरागमन झाले आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: पुढे सरसावत फटका मारणाऱ्या विराट कोहलीला टॉड मर्फीने ‘असा’ दिला चकवा, VIDEO होतोय व्हायरल

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci announced team india squad for the last two test matches of border gavaskar trophy 2023 vbm
Show comments