BCCI Announces Prize Money for Domestic Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशांतर्गत स्तरावरील सर्व महिला आणि कनिष्ठ क्रिकेट स्पर्धांमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार विजेत्यांना बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, बीसीसीआयचे सचिव जय शाह शाह यांनी जाहीर केले की पुरुष क्रिकेटमधील विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ला बक्षीस रक्कम दिली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Sunil Gavaskar on Jay Shah: ‘जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर भारतीय क्रिकेट…” सुनील गावसकरांचे शाह यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य

जय शाह यांचे ट्विट

जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली की, “आम्ही देशांतर्गत क्रिकेटचा भाग असलेल्या सर्व महिला आणि ज्युनियर क्रिकेट स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी बक्षीस रक्कम देण्यास सुरूवात करत आहोत. याशिवाय विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली सिनियर पुरुष स्पर्धेतील सामनावीरासाठी बक्षीस रक्कम दिली जाईल. देशांतर्गत सर्किटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ओळखणे आणि त्यांना बक्षीस देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या प्रयत्नात अटळ पाठिंबा दिल्याबद्दल सर्वोच्च परिषदेचे मनःपूर्वक आभार. आम्ही एकत्रितपणे आमच्या क्रिकेटपटूंसाठी आणखी चांगले वातावरण तयार करत आहोत. जय हिंद.”

हेही वाचा – India Squad for Women’s T20WC: टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, श्रेयांका पाटीलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह, पाहा संपूर्ण संघ

रणजी करंडक विजेत्याला ५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते

गेल्या वर्षी बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ केली होती आणि रणजी करंडक विजेत्याला ५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले होते. इराणी चषकाचे रोख बक्षीसही दुप्पट करण्यात आले असून विजेत्यांना २५ लाखांऐवजी ५० लाख रुपये आणि उपविजेत्याला २५ लाख रुपये देण्यात आले होते. दुलीप ट्रॉफीमध्ये, विजेत्यांना आता १ कोटी रुपये आणि उपविजेत्याला ५० लाख रुपये मिळतील, तर विजय हजारे ट्रॉफीच्या विजेत्याला १ कोटी रुपये आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला ५० लाख रुपये मिळतील.

हेही वाचा – PAK vs BAN: सामना गमावला, क्रिकेट विश्वात फजिती झाली अन् आता ICCनेही पाकिस्तानला दिला धक्का; चुकीची शिक्षा देत…

टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली. रोहित शर्मा हा दुसरा कर्णधार ठरला ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकताच बीसीसीआयने भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci announces prize money for player of the match and player of the tournament in domestic cricket for women and junior competitions bdg