एकीकडे आयपीएलचे सामन्यांची धूम सुरु असताना दुसरीकडे बीसीसीआयने वुमन्स टी-२० चॅलेंज २०२२ सामन्यांसाठी तयारी सुरु केली आहे. १५ मे रोजी या सामन्यांचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे गेल्यानंतर आज बीसीसीआयने सामन्यांसाठी सघांची घोषणा केली आहे. यावेळी एकूण तीन संघ एकमेकांशी भिडणार आहेत. २३ ते २८ मे या कालावधित हे सामने खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा >>> केकेआरला मोठा धक्का! अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर

बीसीसीआयने सुपरनोवाज, ट्रेलब्लॅझर्श आणि व्हेलॉसिटी अशा ती संघाची घोषणा केली आहे. सुपरनोवाज संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे तर ट्रेलब्लॅझर्स संघाचे स्मृती मंधाना आणि व्हेलॉसिटी संघाची धुरा दिप्ती शर्माकडे सोपवली आहे. तर दुसरीकडे मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासरख्या दिग्गज खेळाडूंचा यावेळी महिली टी-२० चॅलेंज २०२२ सामन्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

हेही वाचा >>> अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सची शेवटची पोस्ट शेन वॉर्नवर, शेन वॉर्नची रॉड मार्शवर,२ महिन्यांत ३ दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन

जाणून घ्या तिन्ही संघाचे खेळाडू

सुपरनोवाज

हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (उपकर्णधार), अलाना किंग (परदेशी खेळाडू), आयुष सोनी, चंदू वी, डिआंद्रा डॉटिन (परदेशी खेळाडू), हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकर, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन (परदेशी खेळाडू), सुने लुस (परदेशी खेळाडू), मानसी जोशी

हेही वाचा >>> Video : जोस बटलर-रियान परागची एकच चर्चा, दोघांनी टिपला अप्रतिम झेल, कृणाल पांड्याला केलं ‘असं’ बाद

ट्रेलब्लेझर्स

स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव (उपकर्णधार), अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज (परदेशी खेळाडू), जेमिमाह रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस. मेघना, सायका इशाक, सलमा खातून (परदेशी खेळाडू), शरमीन अख्तर (परदेशी खेळाडू), सोफिया ब्राउन (परदेशी खेळाडू), सुजाता मल्लिक, एस.बी.पोखरकर

हेही वाचा >>> ठरलं! महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे; २३ मेपासून रंगणार थरार

व्हेलॉसिटी

दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा (उपकर्णधार), शफाली वर्मा, अयाबोंगा खाका (परदेशी खेळाडू), केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस (परदेशी खेळाडू), कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड (परदेशी खेळाडू), माया सोनवणे, नत्थकन चंथम (परदेशी खेळाडू), राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा

हेही वाचा >>> ऋतुराज गायकवाडने रचला ‘हा’ अनोखा विक्रम, अर्धशतक झळकावत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

वेळापत्रक

२२ मे- संध्याकाळी ७:३० – ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज

२४ मे – दुपारी ३.३० वाजता – सुपरनोवाज विरुद्ध व्हेलॉसिटी

२६ मे- संध्याकाळी ७:३० – व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स

28 मे- संध्याकाळी ७:३० – अंतिम सामना

Story img Loader