BCCI Announced India 2024-25 Fixtures: भारतीय संघाचे २०२४-२५ मधील घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ या मोसमात बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्याची सुरुवात १९ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेने होणार आहे. भारतीय संघ प्रथम बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी १९ ते २३ सप्टेंबर २०९२४ आणि दुसरी कसोटी २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ दरम्यान खेळवली जाईल. तर ६, १ आणि १२ ऑक्टोबर रोजी टी-२० सामने होणार आहेत.
BCCI ने जाहीर केलं भारताचं वेळापत्रक
बांगलादेश संघाचा भारत दौरा
कसोटी मालिका
पहिली कसोटी – १९ ते २३ सप्टेंबर – चेन्नई – सकाळी ९.३० वाजता
दुसरी कसोटी – २७ ते १ ऑक्टोबर – कानपूर – सकाळी ९.३० वाजता
टी-२० मालिका
६ ऑक्टोबर – पहिला टी-२० सामना – धरमशाला
९ ऑक्टोबर – दुसरा टी-२० सामना – दिल्ली
१२ ऑक्टोबर – तिसरा टी-२० सामना – हैदराबाद
न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडसोबत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. हे सामने अनुक्रमे १६ ऑक्टोबर, २४ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरपासून सुरू होतील.
हेही वाचा – T20 WC 2024: अमेरिका जिंकता जिंकता हरली; अँड्रियस गौसची झुंज अपयशी
न्यूझीलंड संघाचा भारत दौरा
पहिली कसोटी -१६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर – बंगळुरू – सकाळी ९.३० वाजता
दुसरी कसोटी – २४ ते २८ ऑक्टोबर – पुणे – सकाळी ९.३० वाजता
तिसरी कसोटी – १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर – मुंबई – सकाळी ९.३० वाजता
इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार
इंग्लंडचा संघ यावेळी पुन्हा भारतात मोठ्या दौऱ्यासाठी येणार आहे. येथे, भारत आणि इंग्लंड यांच्यात २२ जानेवारी २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.
? NEWS ?
— BCCI (@BCCI) June 20, 2024
BCCI announces fixtures for #TeamIndia (Senior Men) international home season 2024-25.
All the details ? @IDFCFIRSTBank
भारत वि इंग्लंड ५ सामन्यांची टी-२० मालिका
२२ जानेवारी २०२५ – पहिला टी-२० सामना – चेन्नई – संध्याकाळी ७ वा.
२५ जानेवारी २०२५ – दुसरा टी-२० सामना – कोलकाता – संध्याकाळी ७ वा.
२८ जानेवारी २०२५ – तिसरा टी-२० सामना – राजकोट – संध्याकाळी ७ वा.
३१ जानेवारी २०२५ – चौथा टी-२० सामना – पुणे – संध्याकाळी ७ वा.
२ फेब्रुवारी २०२५ – पाचवा टी-२० सामना – मुंबई – संध्याकाळी ७ वा.
भारत वि इंग्लंड ३ सामन्यांची वनडे मालिका
६ फेब्रुवारी २०२५ – पहिला वनडे सामना – नागपूर – दुपारी १.३० वा
९ फेब्रुवारी २०२५ – दुसरा वनडे सामना – कटक – दुपारी – १.३० वा
१२ फेब्रुवारी २०२५ – तिसरा वनडे सामना – अहमदाबाद – दुपारी १.३० वा.