BCCI Annual Contract List: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी टीम इंडियाच्या पुरुष खेळाडूंसाठी वार्षिक कराराची यादी जाहीर केली. बीसीसीआयने सादर केलेल्या यादीत २६ खेळाडूंचा समावेश असून त्यांना चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. A+, A, B आणि C अशा श्रेणीनुसार प्रत्येक खेळाडूला ठराविक रक्कम ऑक्टोबर २०२२- सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी बीसीसीआयकडून देण्यात येणार आहे. या यादीनुसार कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार हे जाणून घेऊया..
BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना किती मानधन देतं?
A+ (७ कोटी)
- रोहित शर्मा
- विराट कोहली
- जसप्रीत बुमराह
- रवींद्र जडेजा
A गट (५ कोटी)
- हार्दिक पांड्या
- आर अश्विन
- मोहम्मद. शमी
- ऋषभ पंत
- अक्षर पटेल
B गट (३ कोटी)
- चेतेश्वर पुजारा
- केएल राहुल
- श्रेयस अय्यर
- मोहम्मद.सिराज
- सूर्यकुमार यादव
- शुभमन गिल
C गट (१ कोटी)
- उमेश यादव
- शिखर धवन
- शार्दुल ठाकूर
- इशान किशन
- दीपक हुडा
- युझवेंद्र चहल
- कुलदीप यादव
- वॉशिंग्टन सुंदर
- संजू सॅमसन
- अर्शदीप सिंग
- केएस भारत
यंदा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला रोहित शर्मा व विराट कोहली सह यादीत पदोन्नती मिळाली आहे. तर शिखर धवन आणि केएल राहुल यांना नव्याने जाहीर झालेल्या करारांमध्ये थेट सी गटातील खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.