New BCCI Secretary Appointment not in Agenda Apex Council Meeting : बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची बैठक बुधवारी होणार आहे. यावेळी मंडळाच्या कामकाजाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे माजी सचिव जय शाह यांच्या जागी नवीन सचिव नेमण्याचा विषय अजेंड्यात नाही. पाच दिवसांत बंगळुरू येथे होणाऱ्या बोर्डाच्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी (एजीएम) सर्वोच्च परिषदेची ही शेवटची बैठक असेल. जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अद्याप नवीन सचिवाची नियुक्ती झालेली नाही.

बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीचा अजेंडा काय?

येत्या एजीएममध्ये जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदाच्या सध्याच्या भूमिकेतून पायउतार होणार नाहीत. कारण ते १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत, परंतु नामांकन प्रक्रियेवरील चर्चा देखील यादीतील आठ बाबींचा भाग नाही. सर्वोच्च परिषदेचा अजेंडा ज्यामध्ये बायजूच्या प्रकरणातील अपडेट्सचा समावेश आहे. पेमेंट सेटलमेंटबाबत बीसीसीआयचा त्यांच्या माजी टायटल स्पॉन्सर बायजूसोबत वाद आहे. एडटेक फर्मने गेल्या वर्षी मार्चमध्ये बीसीसीआयसोबतचा प्रायोजकत्व करार संपवला होता.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी

बायजूचे प्रकरण सूचीबद्ध –

बायजू रवींद्रन यांनी सह-स्थापित केलेल्या बंगळुरूस्थित कंपनीने सुरुवातीला मार्च २०१९ मध्ये तीन वर्षांसाठी जर्सी प्रायोजकत्व करारावर स्वाक्षरी केली, जी नंतर ५५ लाख डॉलर रकमेसाठी आणखी एका वर्षासाठी वाढविण्यात आली. सप्टेंबर २०२२ पर्यंत पेमेंट करण्यात आले होते, परंतु वाद ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ पर्यंतच्या थकबाकी भरण्याबाबत आहे.

हेही वाचा – IND vs BAN : ‘ती अडाणी माणसं आहेत, त्यांना क्रिकेटबद्दल काही कळत नाही’, बासित अली असं कोणाला म्हणाले? जाणून घ्या

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनाबाबतही चर्चा –

बंगळुरूच्या बाहेरील अत्याधुनिक राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) च्या उद्घाटनाबाबतही चर्चा केली जाईल. सध्या एम चिन्नास्वामी स्टेडियम संकुलात एनसीए दोन दशकांहून अधिक काळापूर्वी सुरू झाल्यापासून कार्यरत आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयाच्या बाहेरील भागाचे नूतनीकरणाचे काम सुरू करणे आणि ईशान्य विकास प्रकल्पाला मंजुरी देणे हेही अजेंड्याचा भाग आहेत.

Story img Loader