क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पी. एस. एम. चंद्रन यांची इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सातव्या हंगामाचे उत्तेजक नियमन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये तर, दुसरा टप्पा भारतात होणार आहे. बीसीसीआय आणि स्वीडनच्या आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी आणि व्यवस्थापन संस्थेने एकत्रितपणे चंद्रन यांची नियुक्ती केली आहे.
दुबई, शारजा आणि अबू धाबी येथे होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांनंतर चंद्रन खेळाडूंच्या उत्तेजक चाचण्या घेणार आहेत. भारताबाहेर होणाऱ्या स्पर्धेकरता पहिल्यांदाच स्वीडनच्या संस्थेतर्फे भारतीय वैद्यकीय तज्ञाची याप्रकरणी मदत घेतली जाणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सल्लागार म्हणून कार्यरत डॉ. चंद्रन राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेच्या शिस्तपालन समितीचे सदस्यही आहेत.
पीएसएम चंद्रन आयपीएलचे उत्तेजक नियमन अधिकारी
क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पी. एस. एम. चंद्रन यांची इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सातव्या हंगामाचे उत्तेजक नियमन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
First published on: 18-04-2014 at 12:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci appoints p s m chandran as lead doping control officer in ipl