BCCI Asks Rohit Sharma to Decide About Future Plans in Cricket After Champions Trophy: भारतीय संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचा सराव करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या वनडे मालिकेत भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा सराव करणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्यातील काय योजना असणार आहेत, याबाबत माहिती देण्यास सांगितलं आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा प्रदीर्घ काळापासून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत आहे, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये तो खराब फॉर्मातून जात आहे आणि असे मानले जाते की चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या कारकिर्दीसाठी खूप महत्वाची आहे कारण त्यावर त्याचे भविष्य अवलंबून असणार आहे. आता टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने रोहितला आगामी आयसीसी टूर्नामेंटनंतर त्याच्या भविष्यातील योजना सांगण्यास सांगितले आहे.

रोहित शर्माला त्याच्या भविष्यातील योजना सांगण्यामागचे कारण म्हणजे बीसीसीआय २०१७ वनडे वर्ल्डकपसाठी संघबांधणी करू शकेल आणि कसोटी क्रिकेटमध्येही भारतीय संघ मोठ्या बदलांमधून जाणार आहे. याशिवाय दोन्ही फॉरमॅटमध्ये स्थिर कर्णधारपदाचा पर्याय शोधू पाहत आहेत, जेणेकरून त्यानुसार संघबांधणी करता येईल. विराट कोहलीला कसोटीतील खराब फॉर्मची भरपाई करण्यासाठी आणखी काही वेळ मिळू शकतो, तर वनडेमधील त्याच्या फॉर्मबद्दल निवडकर्त्यांना फारशी चिंता नाही.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “निवडकर्ते आणि बोर्डाने गेल्या संघनिवड बैठकीच्या वेळी रोहितशी ही चर्चा केली होती. त्याला सांगण्यात आले आहे की त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्याची योजना कशी करायची आहे हे त्याला ठरवायचे आहे. संघ व्यवस्थापनाकडे पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चक्र आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी काही योजना आहेत. प्रत्येकजण सारख्याच पेजवर असतील तर संघातील बदल अधिक सुरळीतपणे होतील, असा निवडकर्ते आणि बोर्डाचा विचार आहे.

रोहित शर्मा येत्या एप्रिलमध्ये ३८ वर्षांचा होईल आणि जेव्हा दक्षिण आफ्रिकेत पुढील एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाईल तेव्हा तो ४० वर्षांचा असेल. गेल्या चार महिन्यांत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही आणि जानेवारीत सिडनी येथे झालेल्या भारताच्या अंतिम कसोटीतही त्याने फॉर्ममुळे बाहेर बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०२३ च्या विश्वचषकानंतर तो पुरेसा एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या कारकिर्दीसाठी आणि कर्णधारपदासाठी महत्त्वाची आहे.