ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सलग ५ विजयांची नोंद करणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी खूप दिवसांची विश्रांती मिळाली आहे. २९ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी खेळाडूंना पूर्ण २ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, याच दरम्यान बीसीसीआयने भारतीय संघावर काही गोष्टी करण्याबाबत बंदी घातली आहे. ही बंदी सर्व खेळाडूंना बंधनकारक असणार आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंना डोंगरावर ट्रेकिंग करण्यास बंदी घातली आहे. धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर संघ सध्या येथेच थांबला आहे. दरम्यान, भारतीय खेळाडू शहरातील इतर ठिकाणांना भेट देऊ शकतात, परंतु ट्रेकिंगला पूर्णपणे मनाई आहे. हे नियम वरिष्ठ खेळाडूंना देखील लागू आहेत.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
asha rasal kalyan east
कल्याण पूर्वेत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
India vs South Africa 1st T20 Live Updates in Marathi
IND vs SA 1st T20 Highlights: दक्षिण आफ्रिका ऑलआऊट, भारताचा पहिल्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय

भारताच्या दोन सामन्यांमध्ये सात दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे खेळाडूंना दऱ्या-खोऱ्यात फिरण्यासाठी २ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवले आहे की ते ट्रेकिंगला जाऊ शकत नाहीत, ते बाहेर कुठेही फिरायला जाऊ शकतात, पण ट्रेकिंग करू शकत नाहीत. त्याचबरोबर या मालिकेदरम्यान कोणताही भारतीय खेळाडू पॅरा ग्लायडिंग करू शकत नाही. कारण, हे खेळाडूंच्या कराराच्या विरोधात आहे. यात बीसीसीआय विश्वचषकाच्या तोंडावर कुठलाही धोका पत्करू शकत नाही.”

हेही वाचा: World Cup 2023: “भारताला हरवणे एवढे…”शोएब अख्तरने टीम इंडियाच्या विश्वचषकातील फलंदाजीवर केले सूचक विधान

हिमाचल प्रदेशातील या दऱ्या ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप आकर्षक ठिकाणेही आहेत. अशा स्थितीत भारतीय खेळाडूही ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. मात्र, विश्वचषकामुळे भारतीय संघ कोणत्याही खेळाडूला दुखापत होण्याचा धोका पत्करू शकत नाही. अशा स्थितीत ट्रेकिंगवरील ही बंदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही पाहिली जात आहे.”

काय घडलं सामन्यामध्ये?

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा केला सुपडा साफ! तब्बल १४९ धावांनी मिळवला दणदणीत विजय, महमुदुल्लाहचे शतक व्यर्थ

भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारतीय संघाची विश्वचषक मोहीम आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. संघाने आपले पाचही सामने जिंकले आहेत, ज्यात त्याने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. भारताने विश्वचषकातील गुणतालिकेत कोणताही पराभव न करता अव्वल स्थान कायम राखले आहे.