Champions League T20 Tournament Updates : फ्रँचायझी क्रिकेटमधील वाढत्या रुचीमुळे जगभरातील क्रिकेट मंडळांनी आपापल्या देशात काही टी-२० लीग सुरू केल्या आहेत. तथापि, आयपीएलचा अजूनही स्वतःचा दर्जा आहे आणि कोणतीही टी-२० लीग त्याच्या जवळ नाही. सुरुवातीला, जेव्हा आयपीएल सुरू झाले, तेव्हा जगभरातील संघ एकत्र करून दुसरी लीग खेळवली गेली होती. जिचे नाव चॅम्पियन्स लीग टी-२० होते. यात आयपीएल संघांव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टी-२० संघांनी सहभाग घेतला होता.

एकूण १२ संघांमध्ये ही स्पर्धा होत होती. मात्र, २०२४ मध्ये ती बंद करण्यात आली. आता ही लीग पुन्हा सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांनी ही लीग पुन्हा सुरू करण्यासाठी स्वारस्य दाखवले असून या मंडळांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, आता सर्व देशांमध्ये टी-२० लीग आहेत. अशा परिस्थितीत या संघांची निवड झाल्यास चॅम्पियन्स लीग टी-२० चा उत्साह आणखी वाढू शकतो.

तीन देशांमध्ये चर्चा सुरू –

दहा वर्षांपूर्वी बंद झालेली चॅम्पियन्स लीग क्लब टी-२० चॅम्पियनशिप पुन्हा सुरू करण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे क्रिकेट बोर्ड आपापसात चर्चा करत आहेत. शेवटच्या वेळी चॅम्पियन्स टी-२० लीग २०१४ मध्ये आयोजित करण्यात आली होती, जेव्हा चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी भारताचे तीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक संघ यात सहभागी झाले होते.

हेही वाचा – IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान

२०१४ पर्यंत सहा हंगाम खेळले गेले –

२००९ ते २०१४ दरम्यान चॅम्पियन्स लीगमध्ये सहा हंगाम खेळले गेले, त्यापैकी चार भारतात आणि दोन दक्षिण आफ्रिकेत झाले. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावले, तर न्यू साउथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्स या ऑस्ट्रेलियन संघांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले. क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स म्हणाले की, अत्यंत व्यस्त क्रिकेट कॅलेंडरमध्ये यासाठी एक विंडो तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ काय म्हणाले?

भारतात मेलबर्न क्रिकेट अकादमीच्या लाँचसाठी खेलोमोरसोबतच्या भागीदारी प्रसंगी, ते म्हणाले, “मला वाटते की चॅम्पियन्स लीग हा अकाली पुढाकार होता. तेव्हा टी-२० क्रिकेट इतके परिपक्व नव्हते, पण आता झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ईसीबी आणि बीसीसीआय ते पुन्हा सुरू करण्याबाबत बोलत आहेत. व्यस्त आयसीसी कॅलेंडरमध्ये यासाठी विंडो शोधणे कठीण आहे. कदाचित पहिली चॅम्पियन्स लीग महिला क्रिकेटमध्ये असेल, ज्यामध्ये डब्ल्यूपीएल, द हंड्रेड आणि महिला बिग बॅश लीगचे संघ खेळतील.”

Story img Loader