Indian Cricket Team Chief Selector: एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या स्टिंगमध्ये वरिष्ठ निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी अनेक दावे केले आहेत. भारतीय खेळाडू फिटनेससाठी इंजेक्शन घेतात, असेही त्याने सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नसून त्याची खुर्ची जाणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अनुभवी महेंद्रसिंग धोनीला टीम इंडियाच्या निवड समितीचा अध्यक्ष बनवावा, असा सल्ला एका अनुभवी खेळाडूने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्टिंग ऑपरेशननंतर चेतन अडचणीत

मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खुलासे केले आहेत. यानंतर त्यांची खुर्ची धोक्यात आली आहे. टी२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर त्याला मुख्य निवडकर्त्याच्या पदावरून हटवण्यात आले होते, मात्र २ महिन्यांनंतर ते पुन्हा या खुर्चीवर विराजमान झाले. या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी स्वतःला अडचणीत आणले आहे. भारतीय क्रिकेटमधील अशा वादांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने एक सूचना केली आहे.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: “एका खेळाडूसाठी हा क्षण खूप खास” टीम इंडियाने पुजाराला दिल्या शुभेच्छा; १००वी कसोटी खेळणारा १३वा भारतीय क्रिकेटपटू

एमएस धोनीला मुख्य निवडकर्ता बनवण्याची मागणी

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला नवा निवड समितीचा अध्यक्ष बनवावा, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने बीसीसीआयला दिला आहे. दानिश कनेरिया एका मुलाखतीदरम्यान म्हणाला, “बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एमएस धोनीशी एकदा बोलावे. धोनीची योजना काय आहे आणि तो मुख्य निवडकर्ता होऊ शकतो का, हे त्यांनी शोधले पाहिजे. आता बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी कठोर कारवाई करून नवीन निवड समिती स्थापन करण्याची वेळ आली आहे.”

हेही वाचा: Prithvi Shaw: ‘सेल्फीसाठी एकमेकांचे गळे…’ भररस्त्यात पृथ्वी शॉ अन् महिला फॅनची बाचाबाची, Video व्हायरल

दानिश कनेरियाने धोनीचे जोरदार कौतुक केले

आपल्या कारकिर्दीत ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळलेला कनेरिया म्हणाला, “बीसीसीआयला आता निवड समितीमध्ये नवीन लोकांचा समावेश करण्याची गरज आहे. एमएस धोनीचे ज्या पद्धतीने विचार करतो ते भारतासाठी खूप उपयोगाचे आहे आणि तो एक महान खेळाडू आहे. असे असताना त्यांच्यासारखा खेळाडू निवड समितीत का नाही त्याला क्रिकेटपासून दूर का ठेवले आहे.” असे प्रश्न त्याने विचारले. सध्या तो फक्त आयपीएलमध्ये भाग घेतो आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार असतो. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी२० आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारात आयसीसी विश्वचषक जिंकला आहे.