रमीझ राजा यांची पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यापासून त्यांचा दृष्टिकोन काहीसा बदललेला दिसत आहे. पाकिस्तानचा हा माजी कर्णधार असे वक्तव्य करतोय, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरच भारतीय संघाचे नुकसान झाल्याचा दावा आता रमीझ राजा यांनी केला आहे. बीसीसीआयला पाकिस्तानचा विजय पचवता आला नाही. म्हणून त्यांनी मुख्य निवडकर्ता, निवड समिती आणि कर्णधार बदलल्याचा दावा रमीझ राजाने केला आहे.

रमीझ राजा सुनो टीव्हीला म्हणाले, ”मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही आशिया कप फायनल खेळलो, भारताने ते खेळू शकला नाही. अब्ज डॉलरचा उद्योग असलेला भारत मागे राहिला. ज्यामुळे तोडफोड झालीय त्यांनी मुख्य निवडकर्ता, निवड समिती आणि कर्णधार देखील बदलला. कारण पाकिस्तान त्यांच्या पुढे कसा गेला हे त्यांना पचवता आले नाही.”

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

माझ्यावर अन्याय झाला – रमीझ राजा

रमीझ राजा म्हणाले की, पाकिस्तानमध्ये आपल्यावर अन्याय झाला आहे. ते म्हणाले, “मला काढून टाकणे म्हणजे फ्रान्सने अंतिम सामना खेळूनही संपूर्ण बोर्ड बदलून टाकल्यासारखे आहे.” रमीझ राजाने असा दावाही केला की, त्यानी कर्णधार बाबर आझमला मजबूत केले.

हेही वाचा – IND vs PAK: भारत पाकिस्तान कसोटी मालिका मेलबर्नमध्ये रंगणार?

रमीझ राजा पुढे म्हणाले, ”संघाला एकत्र ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. मी बाबर आझम यांना अधिकार दिला. क्रिकेट हा फार कमी खेळांपैकी एक आहे जिथे कर्णधारपद आवश्यक आहे. जर तुमचा कर्णधार मजबूत असेल तर तुम्हाला परिणाम मिळतात. आणि आम्ही निकाल दिले आहेत.”

रमीझ राजा यांच्या कार्यकाळात, पाकिस्तानने २०२१ टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि २०२२ च्या मार्की स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. याशिवाय, या वर्षाच्या सुरुवातीला आशिया चषक स्पर्धेतही संघ जेतेपदाच्या लढतीत पोहोचला होता; मात्र, पाकिस्तानला दोन्ही स्पर्धेतील अंतिम अडथळा दूर करता आला नाही.

Story img Loader