नवी दिल्ली : बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ६ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात आली.

न्यूझीलंड- अ संघाविरुद्ध झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यासह इराणी चषक स्पर्धेत मुकेशने चमकदार कामगिरी केली, तर पाटीदारने ‘आयपीएल’ची बाद फेरी आणि रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन करणार असून श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेतील तीन सामने अनुक्रमे लखनऊ (६ ऑक्टोबर), रांची (९ ऑक्टोबर) व दिल्ली (११ ऑक्टोबर) येथे खेळवण्यात येणार आहेत.

संघ :

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

Story img Loader