टी-२० विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. हा पराभव बीसीसीआयच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर बीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली आहे.
उपान्त्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा १० गडी आणि ४ षटके राखून दारुण पराभव केला. या पराभवानंतर बीसीसीआयकडून कर्णधार अथवा प्रशिक्षक यांच्याबद्दल मोठा निर्णय घेण्याची चिन्ह दिसत होती. त्यातच आता बीसीसीआयने पूर्ण निवड समितीच बरखास्त केली आहे. तसेच, निवड समितीसाठी नवीन जाहीरातही देण्यात आली आहे.
हेही वाचा : “उमरान मलिक खूप प्रतिभावान…” झहीर-शास्त्री यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
हेही वाचा : बटलरने लाइव्ह मॅचमध्ये कॅमेरून ग्रीनची उडवली खिल्ली; आयपीएल लिलावाबद्दल मारला टोमणा, पाहा व्हिडिओ
टी-२० विश्वचषकात स्पर्धेत चेनत शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघाची निवड केली होती. ती निवड समितीच बीसीसीआयकडून बरखास्त करण्यात आली आहे. आता बीसीआयकडून नवीन निवड समिती स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी जाहीरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये निवड समितीसाठी कोण पात्र ठरू शकतात, याची माहिती दिली आहे.
बरखास्त करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये चेतन शर्मा, हरविंदर सिंग, सुनील जोशी, आणि देबाशिष मोहंती यांचा समावेश होता. यातील काही जणांची २०२० आणि २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.