BCCI Earnings From IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगमुळे बीसीसीआयच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग २०२३ (IPL 2023) मधून ५१२० कोटी रुपयांहून अधिक कमावले आहेत. ही कमाई इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) पेक्षा ११६ टक्क्यांनी जास्त आहे. आयपीएल २०२२ मध्ये बीसीसीआयने २,३६७ कोटी रुपये अधिक कमावले होते. तर बीसीसीआयने २०३८ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरला होता.
इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालानुसार, आयपीएल २०२३ मधील एकूण उत्पन्न वार्षिक ७८ टक्क्यांनी वाढून ११,७६९ कोटी रुपये झाले आहे, तर खर्च ६६ टक्क्यांनी वाढून ६,६४८ कोटी रुपये झाला आहे. नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजकत्व करारामुळे ही वाढ झाली. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत माहिती दिली होती की बीसीसीआयने २०२३-२४ साठी २,०३८ कोटी रुपयांचा जीएसटी भरला.
हेही वाचा – Jay Shah ICC Chairman: जय शाह आता ICC चे अध्यक्ष होणार, ‘या’ व्यक्तीने शर्यतीतून घेतली माघार
बीसीसीआयची २०२३-२४ कमाई
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, बीसीसीआयला आयपीएल २०२३ मधून ५१२० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
आयपीएल २०२२ च्या तुलनेत ही कमाई ११६ टक्के अधिक आहे.
बीसीसीआयने आयपीएल २०२२ मधून २३६७ कोटी रुपये कमावले होते.
आयपीएल २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे एकूण उत्पन्न ११,७६९ कोटी रुपये होते.
या काळात बीसीसीआयच्या खर्चातही वाढ झाली आहे.
बीसीसीआयच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालानुसार, खर्च देखील ६६ टक्क्यांनी वाढून ६६४८ कोटी रुपये झाला आहे.
बीसीसीआयच्या कमाईत वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजकत्व करार.
हेही वाचा – Robin Uthappa: “माझी जी अवस्था झाली होती त्याची लाज वाटत असे”, रॉबिन उथप्पाने उलगडला तो अवघड काळ
नवीन मीडिया हक्क करार
२०२३ ते २०२७ सायकलसाठी ४८.३९० कोटी रुपयांचा नवीन मीडिया हक्क करार आयपीएल २०२३च्या सीझनपासून सुरू झाला. २०२१ मध्ये, डिस्ने स्टारने २३,५७५ कोटी रुपयांची बोली लावून २०२३-२७ साठी IPL चे टीव्ही हक्क जिंकले होते, तर Viacom 18 मालकीच्या Jio Cinema ने २३,७५८ कोटी रुपयांची बोली लावून डिजिटल मीडियाचे अधिकार जिंकले होते.
टाटा टायटल स्पॉन्सर
बीसीसीआयने पाच वर्षांच्या कालावधीसाठी टाटा सन्सला २,५०० कोटी रुपयांना आयपीएलच्या टायटलचे हक्क विकले. MyCircle11, RuPay, AngelOne आणि Ceat यांना सहयोगी प्रायोजकत्व विकून १,४८५ कोटी रुपये कमावले. वार्षिक अहवालानुसार, आयपीएल २०२२ मधील ३,७८० कोटी रुपयांच्या तुलनेत, आयपीएल २०२३ पासून बोर्डाचे मीडिया हक्कांचे उत्पन्न १३१% ने वाढून ८,७४४ कोटी रुपये झाले.
श्रीमंत क्रिकेट बोर्ड
फ्रँचायझी फीमधून मिळणारे उत्पन्न १,७३० कोटी रुपयांवरून २२ टक्क्यांनी वाढून २,११७ कोटी रुपये झाले आहे. प्रायोजकत्व महसूल ८२८ कोटींवरून २ टक्क्यांनी वाढून ८४७ कोटी रुपये झाला. आयपीएल २०१८ आणि २०२२ मधील मीडिया अधिकार केवळ डिस्ने स्टारकडे होते. कंपनीने पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांसाठी १६,३४७ कोटी रुपये दिले होते. तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायदा, १९७५ अंतर्गत नोंदणीकृत, BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली क्रिकेट बोर्ड आहे.