इंडियन प्रीमियर लीगमधील लिलावासंदर्भातील गैरप्रकाराबद्दल आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी दोषी आढळले आहेत. लिलावाच्यामध्ये दोन फ्रेंचायझींना अनुकूलता दर्शवल्यामुळे बोलीच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप मोदींवर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शिस्तपालन समितीच्या १३३ पानांच्या अहवालात मोदी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पहिल्या तीन आयपीएलच्या मोसमामध्ये मोदी यांनी आयपीएलचे अध्यक्षपद-वजा-आयुक्तपद भूषविले होते. परंतु २०१०च्या मोसमाच्या अंतिम सामन्यानंतर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोदी यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर मोदी यांच्यावर बीसीसीआयकडून आजीवन बंदीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci finds modi guilty of misusing power