भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रीमियर लीगच्या संघ आणि मीडिया अधिकारांचा लिलाव केल्यानंतर, आता टायटल स्पॉन्सरशिप हक्क विकण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. बीसीसीआय पहिल्या पाच हंगामांसाठी म्हणजे २०२३ ते २०२७ या कालावधीत टायटल स्पॉन्सरशिप अधिकारांचा लिलाव करेल. या वर्षी मार्चमध्ये महिला प्रीमियर लीगचा (WPL) पहिला हंगाम खेळवला जाणार आहे.

टायटल स्पॉन्सरशिप अधिकार प्राप्त करू इच्छिणाऱ्या कंपन्यांनी प्रस्तावासाठी विनंती (RFP) दस्तऐवज खरेदी करणे आवश्यक आहे. यामध्ये, टायटल स्पॉन्सरशिप लिलावाशी संबंधित सर्व अटी, नियम आणि कायदे, पात्रता निकष, सबमिशन प्रक्रिया याबद्दल माहिती असेल. त्याची किंमत १ लाख रुपये आहे. ज्यावर जीएसटी देखील लागू होईल. तसेच ते नॉन रिफंडेबल असेल. हा दस्तऐवज खरेदी करण्याची अंतिम तारीख ९ फेब्रुवारी २०२२ आहे. दस्तऐवज खरेदी केल्यानंतर, कंपन्यांना पेमेंट तपशील rfp@bcci.tv वर पाठवावा लागेल.

या कंपन्यांनी संघ विकत घेतले आहेत –

नुकताच महिला प्रीमियर लीगसाठी संघांचा लिलाव झाला. पहिल्या सत्रात ५ संघ खेळणार आहेत. अशा परिस्थितीत या ५ फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी १७ कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. यामध्ये आयपीएलचे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांना प्रत्येकी एक संघ मिळाला. इतर दोन संघ अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड आणि कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी विकत घेतले. या ५ संघांची एकूण ४६७० कोटी रुपयांना विक्री झाली.

हेही वाचा – Hockey WC 2023 Final: जर्मनी आणि बेल्जियममध्ये आज अंतिम सामना; हेड टू हेड रेकॉर्डसह सामना कुठे पाहता येणार पाहा

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता-

महिला प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १० आणि ११ फेब्रुवारीला नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये हा लिलाव करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या लिलावात ५ फ्रँचायझी आपापले संघ निवडतील.

Story img Loader