एकीकडे आयपीएलची धूम सुरु असताना दुसरीकडे महिला टी-२० चॅलेंज सामन्यांची जय्यत तयारी सुरु आहे. या स्पर्धेसाठी My11Circle या इंडियन फॅन्टॅसी क्रीटा मंचाने मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत. बीसीसीआयने तसे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
हेही वाचा >>> चेन्नईचा पुन्हा पराभव, सात गडी राखून गुजरातचा दणदणीत विजय; टायटन्सचे ‘टॉप टू’मधील स्थान पक्के
महिला टी-२० चॅलेंज २०२२ सामने येत्या २३ मे ते २८ मे या कालावधित पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे मुख्य प्रोयजकत्व मिळवण्यासाठी My11Circle ने यशस्वीरित्या बोलीमध्ये सहभाग घेऊन प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत. महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिय तसेस भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटू सहभागी होतील. या स्पर्धेमध्ये एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. तर भारतीय महिला क्रिकेट संघातील स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा तसेच लॉरा वोल्वार्ड, सोफी एक्लेस्टोन आणि डिआंड्रा डॉटिन हे अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेत दिसतील.
हेही वाचा >>> Prithvi Shaw Discharge : दिल्ली कॅपिट्लसचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉला मिळाला डिस्चार्ज, मैदानात कधी उतरणार?
My11Circle ने प्रायोजक्तवाचे अधिकार मिळवल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला प्रोत्साहन देण्याचे आमचे ध्येय आहे. महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा ही याचाच एक भाग राहिलेली आहे. या स्पर्धेला मैदान तसेच मैदानाबाहेरही मोठे यश मिळालेले आहे. हे यश उत्साहवर्धक असून आम्ही योग्य दिशेने जात असल्याचा आत्मविश्वास आमच्यात बळावत जातोय,” असे सौरव गांगुली म्हणाले.
हेही वाचा >>>गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती
दरम्यान, आयपीएलचे प्लेऑफचे सामने सुरु असतानाच महिला टी-२० चॅलेंजचे सामने आयोजित केले जात आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी चौकार आणि षटकार तसेच गोलंदाजीचा थरार पाहण्याची दुहेरी पर्वणी ठरणार आहे.