माजी आयपीएल प्रमुख आणि गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी असलेले ललित मोदी यांनी सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यावर केलेला लाचखोरीचा आरोप बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. ललित मोदींनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सोमवारी स्पष्ट केले. आयपीएस स्पर्धेदरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे खेळाडू सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी मुंबई स्थित व्यावसायिकाकडून प्रत्येकी २० कोटींची लाच घेतल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट ललित मोदी यांनी केला. याबाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ललित मोदी यांनी आयसीसीला पत्राव्दारे सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी लाच घेतल्याची माहिती कळवली. त्यानुसार आयसीसीने याबाबतची बीसीसीआयला विचारणा केली. मात्र, ललित मोदींचा आरोपात दखल घेण्यासारखे काही नसून तिन्ही खेळाडूंना बीसीसीआयकडून क्लिन चीट देण्यात आल्याचे ठाकूर म्हणाले.

Story img Loader