गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱयाला मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हिरवा कंदील दाखवला. ‘बीसीसीआय’शी वैमनस्य असलेले दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारून लॉरगेट यांना भारतासोबतच्या चर्चेतून बाजूला करण्याचा निर्णय तेथील मंडळाने घेतल्यानंतर या दौऱयाला मान्यता देण्यात आली. 
गेले काही दिवस लंडनमध्ये झालेल्या चर्चेनंतर भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱयाला मंजुरी देण्यात आली आहे. या दौऱयामध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असे बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयने त्याबाबत प्रतिकूलता दर्शवल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता. हा दौरा झाला नाही तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला मोठे नुकसान होईल, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे दौऱयासाठी सातत्याने बीसीसीआयसोबत वाटाघाटी सुरू होत्या. लॉरगेट याची दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्यापासून बीसीसीआयने आस्ते कदम चालण्याचा निर्णय घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा