भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन घरच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर, संघ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघही फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाईल. बांगलादेशविरुद्ध वनडे आणि कसोटी दौरा पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ पुढील तीन महिने मायदेशात खेळेल.
ज्याला जानेवारीत श्रीलंका दौऱ्यापासून सुरुवात होईल. पुढील वर्षी भारतात होणार्या विश्वचषकाच्या दृष्टीने या तीन मालिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिली टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
१.भारत आणि श्रीलंका टी-२० आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक –
पहिला टी-२० सामना – ३ जानेवारी – मुंबई<br>दुसरा टी-२० सामना – ५ जानेवारी – पुणे<br>तिसरा टी-२० सामना – ७ जानेवारी – राजकोट
पहिला वनडे सामना – १० जानेवारी – गुवाहाटी
दुसरा वनडे सामना – १२ जानेवारी – कोलकाचा
तिसरा वनडे सामना – १५ जानेवारी – त्रिवेंद्रम
२.भारत आणि न्यूझीलंड संघातील टी-२० आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक –
पहिला वनडे सामना – १८ जानेवारी – हैदराबाद
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी – रायपूर
तिसरा वनडे सामना – २४ जानेवारी – इंदौर
पहिला टी-२० सामना – २७ जानेवारी – रांची
दुसरा टी-२० सामना – २९ जानेवारी – लखनौ
तिसरा टी-२० सामना – १ फेब्रुवारी – अहमदाबाद
३.भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील कसोटी वनडे मालिका –
पहिला कसोटी सामना – ९ ते १३ फेब्रुवारी – नागपूर<br>दुसरा कसोटी सामना – १७ ते २१ फेब्रुवारी – दिल्ली
तिसरा कसोटी सामना – १ ते ५ मार्च – धर्मशाळा
चौथा कसोटी सामना – ९ ते १३ मार्च – अहमदाबाद
पहिला वनडे सामना – १७ मार्च – मुंबई
दुसरा वनडे सामना – १९ मार्च – विशाखापट्टनम
तिसरा वनडे सामना – २२ मार्च – चेन्नई