BCCI has announced the schedule of Team India’s tour of South Africa: भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. जिथे संघाला तिन्ही फॉरमॅटच्या मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात १० डिसेंबरपासून ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. यानंतर ३ सामन्यांची वनडे आणि नंतर २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

भारतात खेळल्या जाणार्‍या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडिया टी-२० मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबरला डर्बनमध्ये, तर १२ डिसेंबरला क्युबेरामध्ये खेळणार आहे. मालिकेतील शेवटचा टी-२० सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी

१७ डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून, या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना १९ डिसेंबर रोजी क्युबेरा येथे खेळवला जाईल, तर मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना २१ डिसेंबर रोजी पर्ल ग्राउंडवर खेळवला जाईल.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: मुलाने शतक झळकावताच वडील निघाले कावड यात्रेला, द्विशतक पूर्ण होण्यासाठी देवाकडे केली प्रार्थना, पाहा VIDEO

बॉक्सिंग-डे कसोटी सामना सेंच्युरियन मैदानावर खेळवला जाणार –

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या चक्रात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत म्हणजे परदेशात दुसरी कसोटी मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डेच्या दिवशी सेंच्युरियन मैदानावर सुरू होईल. त्याचवेळी, या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २०२४ च्या सुरुवातीला केपटाऊन मैदानावर ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. यापूर्वी, २०२१-२२ मध्ये भारतीय संघाने शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, तेव्हा त्यांना ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता.