BCCI to send men’s and women’s teams to Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ही यंदा वर्षाच्या अखेरीस चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केली जाणार आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी बीसीसीआय आपले पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेट संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाते.

ज्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्याच वेळी एकदिवसीय विश्वचषकही भारतात आयोजित केला जाईल. अशा स्थितीत पुरुष ब संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला जाईल. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआय या स्पर्धेत प्रमुख महिला खेळाडूंसह एक मजबूत संघ पाठवणार आहे.

International Masters League 2024 Updates in Marathi
IML 2024 : सचिन-लारासह ‘हे’ दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज! ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Maharashtra dominates archery, archery,
तिरंदाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा, युवा आशियाई स्पर्धेत ९ खेळाडूंना पदकाची कमाई, पदक विजेत्यांत पुण्याचे दोन खेळाडू
india vs pakistan womens t20 world cup match preview
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
What is the Irani Cup competition in domestic cricket and what is its history
इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास
Harmanpreet Kaur believes in winning the ICC World Cup cricket tournament sport news
विश्वविजेतेपदाची सर्वोत्तम संधी! ऑस्ट्रेलियालाही टक्कर देण्याचा महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीतला विश्वास
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश

यावेळी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. तसेच ५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. ३० जूनपूर्वी बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवणाऱ्या खेळाडूंची यादी पाठवेल.
२०१० आणि २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाला पाठवण्यात आले नव्हते.

हेही वाचा – IND vs WI: टीम इंडियातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराचा मोठा निर्णय! आता ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार

बीसीसीआयने २०१० आणि २०१४ मध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये क्रिकेट स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने आपल्या पुरुष आणि महिला संघाला पाठवले नव्हते. चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकात क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. २०१८ मध्ये जकार्ता येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे आयोजन करण्यात आले नव्हते.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्यपदकावर नाव कोरले –

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघाने क्रिकेट स्पर्धेत दमदार प्रदर्शन केले होते. संघाने अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाला रौप्यपदकावर समधान मानावे लागले.