WPL 2023 1st Match MIW vs GGW: महिला प्रीमियर लीग २०२३ (WPL 2023) च्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी, बीसीसीआयने डब्ल्यूपीएलचे अॅप लॉन्च केले आहे. जे क्रिकेट आणि डब्ल्यूपीएल चाहत्यांसाठी एक मोठी भेट आहे. त्याचबरोबर क्रिकेटशी संबंधित सर्व माहिती या अॅपवरून उपलब्ध होणार आहे. तुम्ही ते गुगल प्ले अॅपवर डाउनलोड करू शकता. डब्ल्यूपीएलने याबद्दल ट्विट केले आहे, ज्यामध्ये चाहत्यांना नवीनतम अपडेट्ससाठी अॅप डाउनलोड करण्याचे आवाहनही केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआय डब्ल्यूपीएल २०२३ ला प्रचंड यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. या कारणास्तव, प्रेक्षकांना खेळ जवळून पाहता यावा यासाठी डब्ल्यूपीएल मोबाईल अॅप लाँच केले आहे. चाहत्यांना लाइव्ह अॅक्शन बघायला न मिळाल्यास, ते या अॅपद्वारे डब्ल्यूपीएल अॅपमधील सर्व मॅच हायलाइट्स आणि प्रेस कॉन्फरन्स पाहू शकतात.

त्याचवेळी, महिला प्रीमियर लीग २०२३ ची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने होईल. तसेच बोर्डाने मुंबईत एका भव्य उद्घाटन सोहळ्याचे नियोजन केले आहे, जेथे पंजाबी गायक एपी डिलन, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आणि कियारा अडवाणी परफॉर्म करतील.

तसेच, उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर होणाऱ्या सामन्यादरम्यान मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरेल अशी अपेक्षा आहे.

गुजरात जायंट्स स्क्वॉड: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा, अॅश्ले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, किम गर्थ, सबिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबमन शकील.

हेही वाचा – WPL 2023 GJ vs MI: मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुजरातला मोठा धक्का; स्टार अष्टपैलू बाहेर तर ‘या’ खेळाडूला लागली लॉटरी

मुंबई इंडियन्स स्क्वॉड: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा खाजी, सोनामका यादव, जिंतामणी कलिता, नीलम बिश्त.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci has launched wpl app for womens premier league 2023 vbm