BCCI has shared a video of Team India arriving in South Africa : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला १० डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघात तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. यानंतर तीन ३ एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या संघात भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार्या भारतीय संघात प्रामुख्याने युवा खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बीसीसीआयने याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
डोक्यावर बॅग घेऊन खेळाडूंना का धावावे लागले?
बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडूंचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या दौऱ्यात सर्व खेळाडू खूप मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला, तेव्हा तिथे पाऊस पडत होता. यावेळी खेळाडू डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले. विमानतळावर उतरल्यानंतर खेळाडू बसमध्ये जाण्यासाठी भिजण्यापासून वाचण्यासाठी डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले. या मालिकेचे नेतृत्व भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव करणार आहे. अशा परिस्थितीत सूर्यासाठी ही मालिका एखाद्या मोठ्या परीक्षेपेक्षा कमी असणार नाही.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबर रोजी होणार आहे. दुसरा सामना १२ डिसेंबरला तर तिसरा सामना १४ डिसेंबरला होणार आहे. त्याचवेळी, तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबर रोजी होणार आहे, दुसरा सामना १९ डिसेंबर रोजी आणि तिसरा सामना २१ डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकमेव कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.
राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियचा गेम प्लॅन –
या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप कठीण आहे, अशा परिस्थितीत आम्ही सर्वांना एकसारखे खेळण्यास सांगू शकत नाही. यासाठी सर्व खेळाडूंना स्वतंत्र दिले जाईल, जेणेकरून ते त्यांच्या सोयीनुसार संघासाठी योगदान देऊ शकतील.