BCCI shared a video of the Indian team’s dressing room : केपटाऊनमध्ये टीम इंडियाने शानदार विजय नोंदवला. भारतीय संघाच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या विजयानंतरचे वातावरण दाखवण्यात आले आहे. भारतीय खेळाडूंनी डीन एल्गरला जर्सी भेट दिली. विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी त्यावर स्वाक्षरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वास्तविक बीसीसीआयने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचा विजयी क्षण दाखवण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला टीम इंडियाची ड्रेसिंग रूम दाखवण्यात आली आहे. यामध्ये शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एल्गरला जर्सी भेट दिली. यावर सर्व खेळाडूंनी ऑटोग्राफ दिले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही खास स्टाइलमध्ये दिसला. रोहित शर्मा आणि डीन एल्गर यांनी ट्रॉफी शेअर केली.

जसप्रीत बुमराह आणि डीन एल्गर यांना केपटाऊन कसोटीसाठी मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात एडन मार्करमने शतक झळकावले. त्याने १०३ चेंडूंचा सामना करत १०६ धावा केल्या. या कालावधीत त्याने १७ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या मदतीने आफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात १७६ धावा केल्या. तर पहिल्या डावात अवघ्या ५५ ​​धावा करून संघ सर्वबाद झाला. भारताने पहिल्या डावात १५३ धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात ८० धावा करून सामना जिंकला.

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : १०७ षटकं चालला कसोटी इतिहासातील सर्वात लहान सामना, भारताने मोडला ९२ वर्षांचा जुना विक्रम

भारताने तिसऱ्यांदा द. आफ्रिकेला १००हून कमी धावसंख्येवर गुंडाळले –

सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. द. आफ्रिका तिसऱ्यांदा भारताविरुद्ध १००हून कमी धावसंख्येवर गारद झाली. हा संघ २०१५ मध्ये नागपुरात ७९ आणि २००६ मध्ये जोहान्सबर्गमध्ये ८४ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताविरुद्ध १०० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद होण्याची ही कसोटी इतिहासातील ११वी वेळ होती. भारताने आफ्रिकन संघाचा २३.२ षटकांत पराभव करून कोणत्याही संघाला कमी चेंडूत पराभूत करण्याचा विक्रम मोडीत काढला. याआधी २००६ मध्ये जोहान्सबर्ग येथे आफ्रिकेचा २५.१ षटकांत पराभव झाला होता. द. आफ्रिकेच्या डावात केवळ दोनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले.