Asia Cup 2022 India vs Pakistan : आजपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकाला दुबईत सुरूवात होणार असून या स्पर्धेत भारत आपला पहिला सामान २८ ऑगस्टरोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव सुरू आहे.

हेही वाचा – विश्लेषण : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला संधी कितपत?

दरम्यान, उद्या होणाऱ्या हायव्होलटेज सामान्यांपूर्वी बीसीसीयाने एक ट्वीट करत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामान्यासाठी ‘प्लेइंग इलेव्हन’ कशी असेल, याची एक कल्पना दिली आहे. बीसीसीआयने १० खेळाडूंचे फोटो ट्वीट केले आहे. यात केएल राहुल, रोहीत शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग, यांचे फोटो आहे. मात्र, फोटोत रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई आणि दीपक हुडा हे नसल्याने अनेक चर्चांना उधाण आहे आहे.

उद्या ( २८ ऑगस्टरोजी ) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर भारत-पाकिस्तान हा हायव्होलटेज सामना खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव सुरू आहे. पाकिस्तानला बाबर आझम आणि अनुभवी मोहम्मद रिझवानकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात मोहम्मद रिझवानने याच मैदानावर जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळीसुद्धा त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकात खेळत नसल्याने पाकिस्तानसाठी एक चिंतेचा विषय आहे.

हेही वाचा – ‘फिफा’ची भारतावरील बंदी मागे; कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे भारतील संघदेखील आपला पहिला सामना जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल. गेल्या अनेक दिवसांपासून खराब कामगिरीमुळे विराट कोहलीवर सातत्याने टीका होते आहे. या स्पर्धेत आपल्या उत्तम कामगिरीत करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल. दरम्यान, पाकिस्तान प्रमाणेच भारतालाही आपले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांची कमी जाणवेल.