India vs New Zealand Test Series: भारतीय संघाता तब्बल १२ वर्षांनंतर घरच्या भूमीवर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा ११३ धावांनी पराभव झाला. यासह तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलग दोन सामने न्यूझीलंडने जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. भारताच्या या मालिका पराभवानंतर काही तासांनंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने एक फर्मान काढलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मुंबईत कोणतेही पर्यायी सराव सत्र नसल्याची माहिती सर्व खेळाडूंना देण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी सर्वच खेळाडूंना दोन सराव सत्रांमध्ये भाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCI अॅक्शन मोडमध्ये
एका सूत्राने सांगितले की, “संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना ३० आणि ३१ ऑक्टोबरला दोन दिवस सरावासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. हे अनिवार्य आहे आणि कोणीही हे सराव सत्र वगळू शकत नाही. भारतीय संघ आपल्या खेळाडूंना सामन्याच्या एक दिवस आधी नेटवर न येण्याची परवानगी देत आले आहे, जेणेकरून ते पाच दिवसीय सामन्यापूर्वी मानसिकरित्या तयार होऊ शकतील. मात्र, या मालिकेतील पराभवाचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
हेही वाचा – Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने कसोटीत घडवला नवा इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज
सहसा, वेगवान गोलंदाज आणि अव्वल खेळाडू सराव सत्रात सहभागी होत नाहीत किंवा कसोटी सामन्यापूर्वी साधारण ट्रेनिंग करता. गेल्या काही काळापासून ही एक सामान्य प्रथा आहे, विशेषत: क्रिकेटपटूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दा लक्षात घेता संघ व्यवस्थापन सराव सत्राला सूट देते. खेळाडूंना पुन्हा रिकव्हर होण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळू शकेल, यासाठीही सूट दिली जाते. पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक असणार आहे, त्यामुळे संपूर्ण संघ सराव सत्रात सहभागी होईल, जिथे खेळाडू कठोर सराव करतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सध्या सुरू असलेली मालिका ०-३ ने गमावणं भारताला परवडणारं नाही. यानंतर भारत १० नोव्हेंबरला बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दरम्यान, भारतीय कसोटी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल त्यांच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्यासाठी मुंबईत पोहोचले आहेत, तर बहुतांश भारतीय खेळाडू २७ तारखेला सपोर्ट स्टाफसह मुंबईला पोहोचतील.