पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. BCCI ने आज (रविवार) या मेगा इव्हेंटसाठी भारताची नवीन जर्सी लाँच केली आहे. T20 विश्वचषक 2022 साठी निवड समितीने सोमवारीच १५ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केलेली आहे.

भारतीय संघ सध्या परिधान करत असलेली जर्सीचा रंग ‘नेव्ही ब्लू’ आहे. मात्र आता भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे. गेल्या विश्वचषकाच्या जर्सीला बिलियन चीअर्स जर्सी असे नाव देण्यात आले होते आणि त्याचा पॅटर्न टीम इंडियाच्या चाहत्यांपासून प्रेरित होता. यावेळी बीसीसीआयने ट्विट करून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला लिहिले, “भारतातील सर्व क्रिकेट चाहत्यांनो, ही तुमच्यासाठी आहे. सादर करत आहोत नवीन T20 जर्सी – वन ब्लू जर्सी”.

Indian Cricket Team To Get New Batting Coach In Gautam Gambhir Support Staff BCCI To Take New Decision
टीम इंडियाला मिळणार नवा फलंदाजी प्रशिक्षक? गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह, BCCI मोठा निर्णय घेणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Wankhede Stadium 50th Anniversary MCA Honour Groundsmen With Jumbo Household Hamper with Unique Idea
Wankhede Stadium: ५ किलो तांदूळ, मिक्सरपासून ते कंगवा अन् टोपीही…, वानखेडेच्या पन्नाशीनिमित्त ग्राऊंडसमॅनचा MCA ने असा केला अनोखा सत्कार
Wankhede Stadium Team India ODI T20 and Test records at Mumbai
Wankhede Stadium : क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडेवर भारताचा कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
BCCI New Guidelines For Indian Players and Their Wife & Family after disastrous Australia series
BCCI ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला लावणार शिस्त, खेळाडूंच्या कुटुंबासाठी नवीन नियम; पत्नी आणि गर्लफ्रेंड…
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर

टीम इंडियाचा अधिकृत कीट पार्टनर एमपीएल स्पोर्ट्स आहे. MPL ने नवीन किटचे डिझाइन आणि पॅटर्न बदलला आहे. यावेळी दोन छटा पाहायला मिळाल्या आहेत. तर, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टमध्ये नवीन जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंचा फोटो शेअर केला. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि महिला संघातील सदस्य हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांचा समावेश आहे. नवीन जर्सीमधील खांदे आणि बाही गडद निळ्या रंगाचे आहेत आणि उर्वरित भाग हलका निळा आहे. जर्सीच्या डाव्या बाजूला एक लहान डिझाइन देखील आहे.

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2022 १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना रविवारी २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. दोन्ही संघ गट २ चा भाग आहेत. पाकिस्ताननंतर, भारताला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश व्यतिरिक्त इतर दोन संघांशी सामना करायचा आहे, ज्यांची घोषणा गट टप्प्यातील सामन्यांनंतर केली जाईल.

T20 World Cup: विराट कोहली सलामीला खेळणार? रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला…

मुख्य सामन्यांपूर्वी भारतीय संघ दोन सराव सामनेही खेळणार आहे.टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या सराव सामन्यांची सुरुवात येत्या १० ऑक्टोबरपासून होत आहे. या सामन्यांमध्ये भारत १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे. हा सामना गाबा येथे होणार आहे. तर १९ ऑक्टोबर रोजी भारताची लढत न्यूझीलंडसोबत याच मैदानावर होणार आहे. आयसीसीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार टी-२० विश्वचषकात भाग घेणारे सर्व १६ संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील.

Story img Loader