भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह पाच पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने वरिष्ठ पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी क्रीडा प्रमुख (Science/Medicine) या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे. उर्वरित पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री टी-२० विश्वचषकानंतर आपले पद सोडतील. शास्त्रींच्या जाण्यानंतर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड ही जबाबदारी स्वीकारेल, अशी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडने प्रशिक्षक होण्यास संमती दिली आहे. द्रविडचा करार प्रथम २०२३ पर्यंत असेल.

हेही वाचा – T20 WC : पाकिस्तानचा शोएब अख्तर भारताच्या दोन ‘दिग्गज’ खेळाडूंना देतोय मसाज; फोटो झाले व्हायरल

अहवालानुसार, द्रविडने टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला भेटून त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी विनंती केली होती आणि त्याने ते मान्य केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci invites job applications for team india head coach and nca adn