भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणले जाते. विविध क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनातून होणारी कमाई, हे त्यामागचे मुख्य कारण आहे. बीसीसीआयच्या एकूण कमाईमध्ये इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) मिळणाऱ्या पैशांचा मोठा वाटा आहे. जेव्हापासून आयपीएलचे आयोजन सुरू झाले आहे, तेव्हापासून आपल्या क्रिकेट मंडळाच्या तिजोऱ्या दिवसेंदिवस फुगतच चालल्या आहेत. येत्या चार ते पाच वर्षांत ही कमाई कित्येक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. येत्या रविवारी बीसीसीआयला हजारो कोटी रुपये मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकताच आयपीएलचा १५वा हंगाम यशस्वीपणे पार पडला. त्यामुळे आता बीसीसीआय पुढील वर्षीच्या आयपीएल तयारीला लागली आहे. १२ जून रोजी आयपीएलशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. रविवारी आयपीएलच्या माध्यम हक्कांचा (मीडिया राईट्स) लिलाव आयोजित केला जाणार आहे. या लिलावातून बीसीसीआयला ६० हजार कोटी रुपयांची घसघशीत कमाई होणार असल्याची चर्चा आहे. आयपीएल माध्यम हक्कांची लिलाव प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी एम-जंक्शन ई-लिलाव पद्धतीचा वापर होणार आहे. १२ जूनपासून सुरू होणारी ई-लिलाव प्रक्रिया किती दिवस चालेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.

हेही वाचा – बॅट हातात न घेताच विराट कोहलीने ठोकले द्विशतक! कसे ते वाचा

आयपीएलची लोकप्रियता बघता माध्यमांदेखील यातून भरपूर नफा मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे सुमारे डझनभर कंपन्यांनी आयपीएल माध्यम हक्क निविदा घेतल्या आहेत. डिस्ने हॉटस्टार, सोनी नेटवर्क, वायाकॉम १८, झी एंटरटेन्मेंट यांसारख्या देशांतर्गत कंपन्यांशिवाय अमॅझॉन, अ‌ॅपल आणि गुगलसारख्या विदेशी कंपन्याही या लिलाव प्रक्रियेमध्ये स्वारस्य दाखवताना दिसत आहेत. या सर्व कंपन्यांचा पसारा प्रचंड मोठा आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत भरघोस बोली लागण्याची शक्यता आहे.

२०२३ ते २०२८ या कालवधीसाठी एकूण चार भागांमध्ये आयपीएलचे माध्यम हक्क विकले जाणार आहेत. अशा प्रकारची विक्री पहिल्यांदाच होत आहे. यापूर्वी सर्व हक्क एकत्रितपणे विकले जात होते. डिजिटल माध्यमांच्या वाढीमुळे बीसीसीआयने यावेळी एकाच पॅकेजऐवजी चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये हे हक्क विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३२ हजार ८९० कोटी रुपये मूळ किंमत (बेस प्राइस) निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे या रकमेपासून बोली लागण्यास सुरुवात होईल. ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बीसीसीआयला या लिलावातून ६० हजार कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.

हेही वाचा – IND vs SA: क्रिकेटसाठी वाट्टेल ते, टी ट्वेंटी सामन्यासाठी बदलले मेट्रोचे वेळापत्रक!

आयपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ मध्ये खेळवण्यात आला होता. त्यावेळी सोनी कंपनीने त्याच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले होते. २००८ ते २०१७ या कालावधीसाठी सोनीने बीसीसीआयला आठ हजार २०० कोटी रुपये मोजले होते. तेव्हा ऑनलाइन प्रक्षेपण नव्हते. यानंतर बीसीसीआयने २०१८ मध्ये पुन्हा माध्यम हक्कांची विक्री केली. यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने त्यांची खरेदी केली होती.