BCCI issues revised schedule for international home season 2024-25 : बीसीसीआयने आगामी देशांतर्गत हंगाम २०२४-२५ साठी टीम इंडियाचे अद्ययावत वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, त्यासाठी मैदानात मोठा बदल करण्यात आला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना, जो सुरुवातीला धर्मशाला येथे ६ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळवला जाणार होता, तो आता ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाईल. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन धर्मशाला स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये सुधारणा करत आहे, त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यांसाठी स्थळांची अदलाबदलही जाहीर केली. चेन्नई, जिथे पहिला टी-२० सामना होणार होता, आता दुसरा सामना तर कोलकाता पहिला टी-२० सामना आयोजित करेल. पहिल्या टी-२० सामन्याच्या (२२ जानेवारी २०२५) आणि दुसऱ्या टी-२० सामन्याच्या (२५ जानेवारी २०२५) तारखा त्याच राहतील. कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनला त्यांच्या प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या वचनबद्धते आणि जबाबदाऱ्यांबाबत विनंती केल्यानंतर स्थळामध्ये बदल करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेचे वेळापत्रक –

  • पहिला कसोटी सामना: १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, सकाळी ९.३०, चेन्नई
  • दुसरा कसोटी सामना: २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, सकाळी ९.३०, कानपूर

हेही वाचा – Arshad Nadeem : ‘…हा देशाचा आणि अर्शदचा अपमान’, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू पीएम शाहबाज शरीफ यांच्यावर का संतापला? जाणून घ्या

भारत विरुद्ध बांगलादेश टी-२० मालिकेचे वेळापत्रक –

  • पहिला टी-२० सामना – ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.००, ग्वाल्हेर
  • दुसरा टी-२० सामना – ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.००, दिल्ली
  • तिसरा टी-२० सामना – १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.००, हैदराबाद

इंग्लंड संघाचा भारत दौरा –

इंग्लंडचा संघ नवीन वर्षात भारत दौऱ्यावर येणार असून तो २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात पाच टी-२० सामने आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. हा दौरा १२ फेब्रुवारीला संपणार आहे. भारतीय संघ सध्या दीर्घ विश्रांतीवर आहे. १९ सप्टेंबरपूर्वी टीम इंडियाचे कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने नाहीत. भारत दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक –

  • पहिला टी-२० सामना- कोलकाता (२२ जानेवारी, संध्याकाळी ७.००)
  • दुसरा टी-२० सामना- चेन्नई (२५ जानेवारी, संध्याकाळी ७.००)
  • तिसरा टी-२० सामना- राजकोट (२८ जानेवारी, संध्याकाळी ७.००)
  • चौथा टी-२० सामना – पुणे (३१ जानेवारी, संध्याकाळी ७.००)
  • पाचवा टी-२० सामना- मुंबई (२ फेब्रुवारी, संध्याकाळी ७.००)

हेही वाचा – Paris Olympics : कॅरेबियन क्रिकेटपटूच्या मुलाने ऑलिम्पिकमध्ये जिंकली २ सुवर्णपदकं, दोन वर्षांपूर्वी सचिनने केली होती मदत

भारत विरुद्ध इग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक –

  • पहिला वनडे सामना- नागपूर (६ फेब्रुवारी, दुपारी १:३०)
  • दुसरा वनडे सामना- कटक (९ फेब्रुवारी, दुपारी १:३०)
  • तिसरा वनडे सामना- अहमदाबाद (१२ फेब्रुवारी, दुपारी १:३०)

Story img Loader