देशातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विजेतेपदाच्या पुरस्कर्त्यांसाठी निविदा मागवल्या आहेत. ‘‘सप्टेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीसाठीच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सामन्यांच्या विजेतेपदाच्या पुरस्कर्त्यांसाठी निविदा मागवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विपणन समितीच्या बैठकीत घेण्यात आला,’’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.
या कालावधीत भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. याशिवाय देशातील स्थानिक क्रिकेट हंगामात समाविष्ट असलेल्या इराणी करंडक, रणजी करंडक, दुलीप करंडक, विजय हजारे करंडक आणि देवधर करंडक क्रिकेट स्पर्धाना पुरस्कर्त्यांचे नाव दिले जाईल. मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात ६ ते २८ ऑगस्टपर्यंत पुरस्कर्त्यांच्या निविदा उपलब्ध असतील.
* ऑक्टोबर २०१३ ते मार्च २०१४ या मागील हंगामासाठी ‘स्टार इंडिया’ने पुरस्कर्त्यांची बोली जिंकली होती. प्रत्येक सामन्यासाठी दोन कोटी रुपये ते बीसीसीआयला द्यायचे.
ल्ल स्टार इंडियाची बोलीची रक्कम त्या आधीच्या हंगामातील पुरस्कर्ते भारती एअरटेलच्या रकमेपेक्षा ३९ टक्क्यांनी कमी होती.
* स्टारने २०१८ पर्यंत बीसीसीआयचे प्रक्षेपणाचे अधिकारसुद्धा आपल्याकडे राखले आहेत. २०१२ मध्ये त्यांनी ही बोली जिंकली होती.

Story img Loader