Team India new jersey launch, India vs West Indies: भारताचा सामना बुधवारी वेस्ट इंडीजविरुद्ध रोसेओ, डॉमिनिका येथे होणार्‍या पहिल्या कसोटीत होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ या मालिकेसाठी नवीन जर्सी परिधान करेल. या जर्सीमधील भारतीय खेळाडूंचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना नवीन जर्सी आवडत नाही कारण त्यावर ‘ड्रीम ११’ लोगो आहे. या जर्सीबाबत चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बर्‍याच चाहत्यांना वाटते की ‘बायजू’ अधिक चांगली होती, दुसरीकडे काहींना वाटते की, “कसोटी जर्सी हळूहळू आयपीएलच्या जर्सीसारखी होत चालली आहे.”

टीम इंडियाची टेस्ट जर्सीवर चाहत्यांनी केले ट्रोल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाची टेस्ट जर्सी बदलली आहे. नवीन टेस्ट जर्सीवर खांद्याच्या ठिकाणी निळे पट्टे आहेत. त्याचवेळी जर्सीच्या समोर लाल रंगात ड्रीम ११ लिहिले आहे. भारतीय संघाची ही नवीन जर्सी चाहत्यांना पसंत नाही. याबाबत चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहे.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
R Ashwin roasted Pakistan cricket fan for trolling Nitish Reddy
R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल
Viral video beating of two people in a moving bus video of incident happening in bhopal shocking video
लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर चाहते आपला संताप व्यक्त करत आहेत. चाहत्यांच्या मते, “क्रिकेट हा आता सामान्य खेळ राहिला नाही. पैसे कमावण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलप्रमाणेच टेस्ट जर्सी बनवली आहे. ‘बायजू’ अधिक चांगला होता असे चाहत्यांना वाटते.” भारतीय संघाने नवीन जर्सीसह काही खेळाडूंचे छायाचित्र शेअर केले आहे, ज्यावर चाहते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. दुसऱ्या एका यूजरने म्हटले की, “’टेस्टचीही बनवली आयपीएल जर्सी, क्रिकेट हा एक धंदा झाला आहे.”

भारताने शेवटचा दौरा २०१९ मध्ये केला होता

भारताने यापूर्वी २०१९ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात भारतीय संघ विजयी झाला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावेळीही कसोटी मालिकेवर कब्जा करण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माशिवाय माजी कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

हेही वाचा: IND vs WI: रिपोर्टर रोहित शर्मा! रहाणेच्या पत्रकार परिषदेत घुसखोरी करत विचारले प्रश्न, हिटमॅनचा ‘हा’ खास Video व्हायरल

यशस्वी जैस्वाल टीम इंडियात पदार्पण करू शकते

दुसरीकडे, १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेशी संबंधित एक माहिती समोर येत आहे. जर या माहितीवर विश्वास ठेवला तर पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश झालेला युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते. याबरोबरच संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडही सध्या जैस्वालसोबत नेटमध्ये काम करत आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी टिप्स देत आहे.