बीसीसीआय सध्या पुरूष क्रिेकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे, यासाठी बोर्डाने अर्जही मागवले आहेत. पण या दरम्यानचं बीसीसीआय न्यूझीलंड संघाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमधील सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या नावाचा विचार करत आहेत. बीसीसीआयच्या अटींप्रमाणे नवे मुख्य प्रशिक्षक हे भारताच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाला प्रशिक्षण देतील. त्यामुळे वर्षातून १० महिने संघासोबत राहणे आवश्यक असलेल्या या पदासाठी फ्लेमिंग खरोखरच अर्ज करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयने सोमवारी भारतीय पुरुष संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ पासून सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक असलेले फ्लेमिंग द्रविडच्या जागी योग्य उमेदवार मानले जात आहेत. भारत पुढील काही वर्षांमध्ये सर्वच फॉरमॅटमध्ये संक्रमणाच्या काळातून जाणार आहे आणि यादरम्यान सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेण्याची क्षमता आणि CSK मधील त्यांचे यश पाहता ते या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत.

हेही वाचा – IPL 2024: दिल्लीचा विजय CSK आणि SRH च्या पथ्यावर, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावी लागणार एकच गोष्ट

मीडिया रिपोर्ट्स आणि बातम्यांनुसार, आयपीएल दरम्यान अनौपचारिक चर्चा झाली आहे. आत्तापर्यंत, ५१ वर्षीय फ्लेमिंगने चेन्नई व्यवस्थापनाशी फ्रँचायझी सोडण्याच्या कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाही, उलट CSK त्यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवू इच्छित आहे. न्यूझीलंडचे माजी खेळाडू स्टीफन फ्लेमिंग हे एक उत्तम प्रशिक्षक तसेच एक जबरदस्त फलंदाज होते. त्याने किवी संघासाठी १११ कसोटी, २८० एकदिवसीय आणि ५ टी-२० सामनेही खेळले आहेत. त्याने कसोटीत ७१७२ धावा, एकदिवसीय सामन्यात ८०३७ धावा आणि टी-२० मध्ये ११० धावा केल्या आहेत. फ्लेमिंग चेन्नईकडून आयपीएलही खेळला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci looking for stephen fleming as india next head coach after rahul dravid reports bdg
Show comments