BCCI Media Rights: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर बीसीसीआय मीडिया राइट्स २०२३-२७ संदर्भात नोटीस काढली आहे. मंगळवारपर्यंत निविदा जारी केली जाईल आणि भारतीय मंडळाचे भागीदार अर्न्स्ट अँड यंग, संभाव्य प्रसारकांना माहिती देतील. २०२३ विश्वचषकापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेसाठी नवीन ब्रॉडकास्टरच्या समावेशासह हक्कांची विक्री ऑगस्ट १९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक २०२३ अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्याअनुषंगाने हा लिलाव खूप महत्वाचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ई-लिलावातून कोट्यावधी रुपयांची कमाई

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, नवीन करार चार नव्हे तर पाच वर्षांसाठी बंधनकारक असेल. इनसाईड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, जरी प्रसारकांना लिलाव प्रक्रियेबद्दल अद्याप माहिती देण्यात आली नसली तरी, हा ई-लिलाव होण्याची शक्यता आहे. ई-लिलावाद्वारे आयपीएल मीडिया अधिकारांच्या विक्रीतून बोर्डाने ४८,३९० कोटी रुपये कमावले, ज्यामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला होता.

हेही वाचा: IND vs WI: मोहम्मद सिराजने केले मोठे भाकीत, ‘हा’ खेळाडू आज भारताला विजय मिळवून देणार; म्हणाला, “चेंडू वळण…”

BCCI मीडिया हक्क निविदेचे ठळक मुद्दे

नवीन करार आयपीएलप्रमाणे ५ वर्षांसाठी असेल. डिजिटल आणि टीव्ही दोन्ही हक्क वेगळे असतील कारण डिजिटल हा वेगळ्या स्वरूपाचा तसेच वेगवान ट्रेंड आहे. उघडउघड बोली लावण्याच्या प्रक्रियेऐवजी ई-लिलाव होण्याची शक्यता आहे.

आयपीएल मीडिया हक्कांच्या विक्रीतून बीसीसीआयला ४८,३९० कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्याचे टीव्ही हक्क आणि डिजिटल अधिकार वेगळे होते.

नवीन करार अंतर्गत कव्हर केलेल्या सामन्यांची नेमकी संख्या जरी अद्याप जाहीर झाली नसली तरी ती चर्चेत घेतली जाणर आहे. पण या करारात १०० द्विपक्षीय सामन्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. नवीन चक्रात अधिक टी२० आणि कमी एकदिवसीय सामने पाहायला मिळतील कारण वन डे मधील प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टारने इतके पैसे दिले होते

डिस्ने-स्टारने १०३ सामन्यांसाठी ६१३८.१० कोटी रुपये दिले होते. त्याचे प्रति सामन्याचे मूल्य ६१ कोटी रुपये होते. मात्र, हक्क वेगळे राहणार असल्याने बीसीसीआयला १२,००० कोटींहून अधिक उत्पन्न अपेक्षित आहे.

हेही वाचा: IND vs WI: मोहम्मद सिराजने वेस्ट इंडीजमध्ये रचला इतिहास, ३४ वर्षांनंतर वर्ल्डकप विजेत्या ‘या’ माजी खेळाडूची केली बरोबरी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक

आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. २०१९च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हे दोन संघ आमनेसामने आले होते. हे दोन्ही संघ ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत. त्याचबरोबर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. ड्राफ्ट शेड्यूलमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही आणि १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदानावर भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.