भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयाकडे एन.श्रीनिवासन आणि महेंद्रसिंग धोनी यांनी दिलेल्या माहितीच्या ध्वनीफीतीची मागणी केली आहे.
आयपीएलच्या सहाव्या मोसमातील फिक्सिंग संदर्भात श्रीनिवासन आणि धोनी यांनी चेन्नई सुपरकिंग्जमधील गुरूनाथ मयप्पनच्या भूमिकेबद्दल खोटी माहिती दिल्याची माहिती समोर आली होती. यापार्श्वभूमीवर बीसीसीआयने आज(बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडे श्रीनिवास आणि धोनी यांनी दिलेल्या माहितीच्या ध्वनीफीतीची मागणी केली.
न्यायाधीश ए.के.पयनायक यांच्या खंडपीठानेही बीसीसीआयला संबंधीत ध्वनीफीत मिळविण्याबाबतचे मागणीपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठीचा हिरवा कंदील दर्शविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा