ललीत मोदींच्या राजस्थान क्रिकेट असोसिएशन निवडणूकीतील सहभागा विरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ललीत मोदींवर आजीवन बंदी घालण्यात आली असूनही मोदींना राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत समाविष्ट करण्यात आले. यावरून राजस्थान क्रिकेट कायदा २००५ला आव्हान देत बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ६ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्याचवेळी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या १९ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आलेल्या निवडणूकीचे निकाल जाहीर करायचे की नाही? यावरही न्यायालय सुनावणी देण्याची शक्यता आहे.
बीसीसीआने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, ललीत मोदींवर क्रिकेट नियामक मंडळाने आजीवन बंदी घातली असूनही राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत त्यांचा सहभाग हा नियामक मंडळाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader