भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २०१२-१३ या आर्थिक वर्षांसाठी ३५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, मंडळाची एकूण उलाढाल ९५० कोटी रुपयांची आहे. क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत संघटना असा लौकिक असलेल्या बीसीसीआयकडे २०११-१२ या आर्थिक वर्षांत ३८२.३६ कोटी रुपये इतकी संचित गंगाजळी होती.
नवी दिल्लीमध्ये झालेल्या वित्त समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले की, ‘‘सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांचा ताळेबंद वित्त समितीने गुरुवारी मंजूर केला. आता तो कार्यकारिणी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.’’ बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठकसुद्धा या कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित करण्यात येईल.
बीसीसीआयला ३५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २०१२-१३ या आर्थिक वर्षांसाठी ३५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, मंडळाची एकूण उलाढाल ९५० कोटी रुपयांची आहे.
First published on: 23-08-2013 at 05:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci net profit of rs 350 crore