BCCI Officials Allowance Increase: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांना आता परदेश दौऱ्यांवर एक हजार डॉलर्सचा दैनिक भत्ता मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना प्रथम श्रेणीत प्रवास करण्याचा अधिकार असेल. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचे भत्ते वाढवण्याचा प्रस्ताव रविवारी सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु तो गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. सात वर्षांहून अधिक काळानंतर दैनिक भत्ते वाढले आहेत.

याआधी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना परदेश दौऱ्यावर दररोज ७५० डॉलर मिळत होते. बीसीसीआयच्या दस्तऐवजानुसार, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संयुक्त सचिवांसह पदाधिकाऱ्यांना भारतात मीटिंगसाठी आणि बिझनेस क्लासमध्ये प्रवासाची सुविधा यासाठी दररोज ४०,००० रुपये मिळतील. कामाच्या संदर्भात प्रवास करण्यासाठी त्यांना दररोज ३०,००० रुपये भत्ता दिला जाईल.

Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding
दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
Mumbai, Metro Worli, Mumbai, Metro Mumbai,
मुंबई : मार्चपासून मेट्रोची धाव वरळीपर्यंतच
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

देशांतर्गत आणि परदेश दौर्‍यावर त्यांच्यासाठी ‘सूइट’ रूम बुक केली जाईल. आयपीएल अध्यक्षांचे भत्तेही पदाधिकाऱ्यांच्या श्रेणीत समाविष्ट केले आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या दोन प्रतिनिधींसह बीसीसीआय सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या प्रत्येक त्रैमासिक बैठकीसाठी ४०,००० रुपये प्रतिदिन मिळतील. परदेश दौऱ्यावर त्यांना ५०० डॉलर्स दिले जाणार आहेत. तथापि, सामान्यत: अधिकारी कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जातात.

हेही वाचा – IPL 2023: पाच षटकारानंतर यश दयालला अश्रू अनावर; वडिलांनी ‘या’ खेळांडूचे उदाहरण देत सावरण्याचा दिला सल्ला

मंडळाने त्यांच्या राज्य संघटनांच्या सदस्यांच्या भत्त्यांमध्येही सुधारणा केली आहे. त्यांना आता देशांतर्गत प्रवासासाठी दररोज ३०,००० रुपये आणि परदेशी प्रवासासाठी दररोज ४०० डॉलर्स मिळतील. पुरुष आणि महिला राष्ट्रीय क्रिकेट संघांसाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीच्या तीन सदस्यांना प्रत्येक बैठकीसाठी ३.५ लाख रुपये दिले जातील. त्याच्या बाबतीत, परदेशात प्रवास करण्याची शक्यता नाही, परंतु जर त्याने असे केले तर त्याला दररोज ४०० डॉलर्स दिले जातील. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचे पद हे मानाचे असते. सीईओ सारख्या बीसीसीआयच्या पगारदार कर्मचाऱ्याला परदेश दौऱ्यांवर दररोज ६५० डॉलर्स आणि भारतात १५,००० रुपये मिळतात.

Story img Loader