BCCI Ombudsman’s Decision: आयपीएल २०१३ मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीचा सामना करणाऱ्या अजित चंडिला यांना बीसीसीआय लोकपालने मोठा दिलासा दिला आहे. बीसीसीआयचे लोकपाल विनीत शरण यांनी अजित चंडिलावरील आजीवन बंदी सात वर्षांची केली आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्यासह अजित चंडिलावरही स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता. या तिन्ही क्रिकेटपटूंना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकही केली होती. २०१३ साली उघडकीस आलेल्या या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला होता. हे प्रकरण सार्वजनिक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. ज्यानंतर बीसीसीआयला आपल्या घटनेतदेखील बदल करण्यात आला.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

२०१३ मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयने अजित चंडिलाला सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून निलंबित केले होते. यानंतर २०१६ मध्ये अजित चंडिलावर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने आजीवन बंदी घातली होती. आणि आता बीसीसीआय लोकपालने १८ जानेवारी २०१६ पासून अजित चंडिलावर ७ वर्षांची बंदी घातली आहे.

हेही वाचा – ‘…म्हणून Yuvraj Singh आणि त्याच्या भावाला आईने घराबाहेर हाकलले’; पाहा मजेदार VIDEO

२०१७ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयने श्रीशांतवर घातलेली आजीवन बंदी उठवली. यापूर्वी २०१५ मध्ये दिल्ली न्यायालयाने श्रीशांतला स्पॉट-फिक्सिंगच्या सर्व आरोपातून दोषमुक्त केले होते, परंतु बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. मात्र, नंतर बीसीसीआयने श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्यावरील आजीवन बंदी उठवली.

श्रीशांतच्या बाजूने आदेश दिल्यानंतर चंडिला आणि चव्हाण यांनीही त्यांच्यावर घातलेली बंदी उठवण्याची मागणी केली. बंदी उठल्यानंतर श्रीशांत त्याच्या होम टीम केरळकडून खेळताना दिसला होता. त्याने केरळ संघाकडून विजय हजारे आमि रणजी स्पर्धेत केरळ संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर अंकित चव्हाण मुंबईतील त्याच्या क्लबकडून खेळताना दिसला होता.

Story img Loader