BCCI Pays Rs 1159 Crore Income Tax: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात बीसीसीआयने कोट्यवधी रुपयांचा आयकर सरकारकडे जमा केला यावरूनही याचा अंदाज लावता येतो. बीसीसीआयची या आर्थिक वर्षात एकूण कमाई ७६०६ कोटी रुपये होती. त्यानंतर बीसीसीआयने सरकारला एकूण ११५९ कोटी रुपये दिले, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७% अधिक कर भरला आहे.

भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ८ ऑगस्ट रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना बीसीसीआय आयकर जमा करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी बीसीसीआयचे गेल्या ५ वर्षातील उत्पन्न आणि त्यानंतर जमा झालेल्या कराची संपूर्ण माहिती दिली आहे.
२०२० मध्ये जेव्हा जगभरात कोरोना महामारीचा प्रभाव दिसत होता, तेव्हा त्याचा परिणाम बीसीसीआयच्या कमाईवरही दिसून आला होता. बायो-बबलमध्ये क्रिकेट सामने होत असल्याने खर्चात वाढ झाली होती आणि स्टेडियममध्ये चाहत्यांच्या येण्यावर बंदी असल्याने त्याचा परिणाम कमाईवरही दिसून आला होता.

ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
BJP, sameer meghe, NCP Sharad Pawar ramesh bang
हिंगण्यात मेघेंची हॅटट्रिक बंग रोखणार ?

बीसीसीआयसाठी आयसीसीच्या महसूल संचातून मिळणारे उत्पन्न हा फक्त एक स्रोत आहे. बीसीसीआयला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजनातून आणखी एक मोठी रक्कम मिळते, ज्यामुळे त्यांना खूप मोठी रक्कम मिळते. खेळाडूंचा सहभाग आणि प्रायोजकत्व या दोन्ही बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वात किफायतशीर लीग राहिली आहे.

हेही वाचा – IND vs WI 3rd T20: ‘सवाल एक जवाब दो…’; वादळी खेळीनंतर सूर्यकुमार यादवने तिलकची घेतली मजेदार मुलाखत, पाहा VIDEO

बीसीसीआयने गेल्या ५ वर्षात कधी आणि किती भरला कर?

बीसीसीआयने मागील ५ वर्षात दिलेल्या आयकर माहितीनुसार, जी सरकारने दिली होती, त्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५९६.६३ कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ८१५.०८ कोटी रुपये, २०१९-२० मध्ये, ८८२.२९ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये ८४४.९२ कोटी रुपये, तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११५९ कोटी रुपये बीसीसीआयने सरकारला आयकर म्हणून दिले आहेत. त्याचबरबर २०२०-२१ मध्ये बीसीसीआयचे उत्पन्न ४७३५ कोटी रुपये आणि खर्च ३०८० कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षात बीसीसीआयची कमाई ७६०६ कोटी रुपयांवर पोहोचली असताना, खर्च ३०६४ कोटी रुपये होता.