BCCI President Roger Binny and Vice President Rajeev Shukla left for Pakistan: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला आशिया कप २०२३ साठी सोमवारी पाकिस्तानला रवाना झाले. दोन्ही अधिकारी पंजाबमधील अमृतसर विमानतळावर पोहोचले. मंगळवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान ते उपस्थित राहू शकतात.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) निमंत्रणावरून बिन्नी आणि शुक्ला आशिया कप २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जात आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला आशिया कप २०२३ साठी पाकिस्तानला जाण्यासाठी अटारी-वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानला जाणार आहेत.
रवाना होण्यापूर्वी राजीव शुक्ला म्हणाले की, त्यांचा दोन दिवसांचा दौरा राजकीय नसून केवळ क्रिकेटचा आहे. ते म्हणाला, “हा दोन दिवसांचा दौरा निव्वळ क्रिकेटचा आहे, राजकारण नाही. यादरम्यान एका डिनरचेही आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तिघांचा समावेश आहे.”
हेही वाचा – IND vs NEP: विराट कोहली-रोहित शर्मासाठी नेपाळच्या कर्णधाराचा खास प्लॅन तयार, टीम इंडियाला व्हावं लागेल हुशार
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी २००६ नंतर प्रथमच पाकिस्तानला भेट देत आहेत. या दौऱ्याबाबत आपण खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. बिन्नी म्हणाले, “मी माझ्या दौऱ्याबद्दल उत्साहित आहे.” भारतीय संघ टूर्नामेंटसाठी पाकिस्तानचा दौरा का करत नाही आणि भविष्यात दौरा करू शकतो का, असे विचारले असता शुक्ला म्हणाले, “सरकारच्या आदेशानुसार आम्ही काम करू, सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.”
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला वाघा बॉर्डरमार्गे लाहोरला पोहोचतील आणि ते ७ सप्टेंबरपर्यंत पाकिस्तानमध्येच राहतील. भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर, पीसीबीला पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया कप खेळला जात असलेल्या एसीसीला संकरित मॉडेल सादर करणे भाग पडले. पाकिस्तान चार सामन्यांचे यजमानपद भूषवत आहे, तर उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
हेही वाचा – Rishabh Pant : टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज, एनसीएमध्ये दाखवला जबरदस्त फिटनेस, पाहा VIDEO
२ सप्टेंबरला भारतीय संघाचा पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. टीम इंडिया आता मंगळवारी नेपाळविरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. नेपाळविरुद्धच्या विजयासह भारतीय संघ सुपर-4 साठी पात्र ठरेल.