करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IPL नंतर डीव्हिलियर्स पुन्हा आफ्रिकेकडून खेळणार?

सदैव व्यस्त असणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पदाधिकारी आणि अधिकारी वर्गालादेखील करोनामुळे मोकळा वेळ मिळाला आहे. BCCI अध्यक्ष माजी कर्णधार सौरव गांगुली याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तो नुसताच बसला असल्याचे दिसत आहे. “सारे जग करोना व्हायरसच्या भीतीपोटी शांत आहे. माझ्या घराच्या लाऊंजमध्ये संध्याकाळी ५ वाजता मी काहीही काम न करता बसलो आहे.. एकदम निवांत.. या आधी असा निवांत वेळ मला कधी मिळाला होता आठवतंही नाही…”, असे त्याने फोटोला कॅप्शन दिले आहे.

CoronaVirus : “भारतातून आला आहात… जरा लांबच राहा”

CoronaVirus : IPL 2020 आणखी लांबणीवर; आता एप्रिलऐवजी ‘या’ महिन्यात आयोजन?

दरम्यान, भारतात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. दर दिवशी नवीन करोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहेत. करोना विषाणूचा फटका अनेक क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. करोनाच्या धडकीने IPL चे आयोजनही लांबणीवर पडले आहे. त्यामुळे बीसीसीआयने अनेक महत्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत. तसेच बीसीसीआयने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या मुंबईतील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे.